अज्ञाताचे चक्र
घट्ट मिटलेल्या तुझ्य़ा मुठी इवल्याश्या,
लुकलुक डोळ्यांवर पापण्या जराश्या,
गोड तुझॆ किती भासे रुपडे तान्हुल्या,
साय पसरली तुझ्य़ा अंगी रे सोनुल्या,
स्वप्नांच्या नगरीत चल रे खेळुया (२) ॥१॥
उघडुनी ऒठ जेव्हा बोललास बाबा,
हरखले मन नाही आनंदाला ताबा,
अडखळलास जेव्हा पहिल्या पाऊला,
हॄदयात मायेचा रे फ़ुटे धबधबा,
सारया घरावर चाले तुझा दबदबा ॥२॥
दुडदुड धावता तू आकाश व्यापले,
गिरवुनी ’अ’ ’आ’ तुला खूप शिकवविले,
होऊनीया मोठा जेव्हा विदेशा गाठले,
दूर देशी वेगळे रे घर का बांधले,
सारे प्रेम आमुचे का वाटेत सांडले (२) ॥३॥
उदास चालले दिस उदासले तारे,
बळ मिळे पंखा पिल्लु नभी झेपावले,
तुटले घरटे काडी काडीमोल झाले,
तुझ्या आठवणीमधे काळीज हे झुरे,
ये रे ये रे परतुनी घर आसुसले, ॥४॥
तुझ्या अंगणात येता सानुली पाउले,
डोळ्यामधे तुझ्या झाले आकाश ठेंगणे,
नातवंडामधे माझे स्वप्न मी पाहीले,
न्हाऊ माखु घालु पुन्हा सुखाचे चोचले,
चल बांधु आकाशात उंच उंच झुले (२) ॥५॥
बघ आता बळ त्यांच्या पंखाना द्यायचे,
जोडूनीया काडी काडी घर बांधायाचे,
मोठे होऊनीया पाखरानी उडायाचे,
रीत जगाची रे तीला नाही डराय़ाचे
अज्ञाताचे चक्र आता पुन्हा चालायाचे (२) ॥६॥
घट्ट मिटलेल्या तुझ्य़ा मुठी इवल्याश्या,
लुकलुक डोळ्यांवर पापण्या जराश्या,
गोड तुझॆ किती भासे रुपडे तान्हुल्या,
साय पसरली तुझ्य़ा अंगी रे सोनुल्या,
स्वप्नांच्या नगरीत चल रे खेळुया (२) ॥१॥
उघडुनी ऒठ जेव्हा बोललास बाबा,
हरखले मन नाही आनंदाला ताबा,
अडखळलास जेव्हा पहिल्या पाऊला,
हॄदयात मायेचा रे फ़ुटे धबधबा,
सारया घरावर चाले तुझा दबदबा ॥२॥
दुडदुड धावता तू आकाश व्यापले,
गिरवुनी ’अ’ ’आ’ तुला खूप शिकवविले,
होऊनीया मोठा जेव्हा विदेशा गाठले,
दूर देशी वेगळे रे घर का बांधले,
सारे प्रेम आमुचे का वाटेत सांडले (२) ॥३॥
उदास चालले दिस उदासले तारे,
बळ मिळे पंखा पिल्लु नभी झेपावले,
तुटले घरटे काडी काडीमोल झाले,
तुझ्या आठवणीमधे काळीज हे झुरे,
ये रे ये रे परतुनी घर आसुसले, ॥४॥
तुझ्या अंगणात येता सानुली पाउले,
डोळ्यामधे तुझ्या झाले आकाश ठेंगणे,
नातवंडामधे माझे स्वप्न मी पाहीले,
न्हाऊ माखु घालु पुन्हा सुखाचे चोचले,
चल बांधु आकाशात उंच उंच झुले (२) ॥५॥
बघ आता बळ त्यांच्या पंखाना द्यायचे,
जोडूनीया काडी काडी घर बांधायाचे,
मोठे होऊनीया पाखरानी उडायाचे,
रीत जगाची रे तीला नाही डराय़ाचे
अज्ञाताचे चक्र आता पुन्हा चालायाचे (२) ॥६॥